‌म. टा. वृत्तसेवा, : पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील एका तरुणीवर करून, त्याचा व्हिडीओ पोर्न साइटवर टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मिलिंद अनिल झडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील बेस्टमध्ये कंटक्टर म्हणून काम करतो. अशा व्हिडीओंमधून त्याने हजारो डॉलरची कमाई केली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध , नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या बोईसर शाखेचे सहायक पुलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी सांगितले की,

विक्रमगड तालुक्यातील मिलिंद झडे हा मुंबईतील बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून काम करतो. तो प्रथम तरुण मुलींसोबत जवळीक निर्माण करून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवित असे. तसेच याचे तो व्हिडीओदेखील तयार करीत असे. झडेने अशाचप्रकारे विक्रमगड तालुक्यातील एका तरुणीवर बलात्कार करून, त्याचा व्हिडीओ पोर्न साइटवर टाकला होता. तो खूप व्हायरल झाला होता. झडे याने अशा व्हिडीओंमधून पोर्न साइटवरून हजारो डॉलरची कमाई केली आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच झडेविरोधात ३७६ (एन) २, ४५२, ५०६, आणि आईटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद झडे हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. त्याला अटक करण्याची जबाबदारी पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिली होती. विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी मिलिंद झडेला अटक केली.


Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here