मुंबई: ‘अनलॉक’चा पाचवा टप्पा सुरू झाल्यानंतरही मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा अद्याप बंदच आहे. राज्य सरकारनं सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतरही केंद्रानं त्यावर निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

विविध नियम व अटींच्या अधीन राहून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं २८ ऑक्टोबर रोजी रेल्वेला दिला आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, असं पत्रात सुचवण्यात आलं आहे. त्यासाठीच्या वेळाही सरकारनं पत्रात नमूद केल्या आहेत. रेल्वेनं लवकरात लवकर या पत्रास प्रतिसाद द्यावा, अशी विनंतीही पत्रातून करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेनं अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीची विभागणी करण्याबाबत आवश्यक उपाययोजना झालल्या नाहीत. गर्दीच्या विभाजनासाठी राज्य सरकार अॅप अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय करत नाही, तोपर्यंत सामान्य मुंबईकरांचा लोकलप्रवास प्रत्यक्षात येणार नाही,’ असं रेल्वेनं म्हटलं आहे. मात्र, आता यावरून राजकारण सुरू झालं आहे. रेल्वे विभाग ट्रेन सुरू करण्यात खोडा घालत आहे, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

वाचा:

रोहित पवारांनीही देशमुख यांच्या सुरात सूर मिसळत रेल्वेमंत्री व भाजपवर टीका केली आहे. ‘श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्वीट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरू करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात,’ असा बोचरा टोला त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना हाणला आहे.

यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांसाठी रेल्वे सोडण्याच्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकार आमनेसामने आले होते. रेल्वे सोडल्यानंतरही तिकिटांवरूनही केंद्र व राज्याच्या मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. रेल्वेमंत्री हे त्यावेळी ट्विटरवरून स्वत: राज्य सरकारला लक्ष्य करत होते. तोच धागा पकडून रोहित यांनी आता आपल्या ट्वीटमधून गोयल व भाजपला लक्ष्य केलं आहे.

वाचा: वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

57 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here