गोरखपूरच्या तिवारीपूर परिसरात गीता तिवारी हिच्या घरी बर्थडे पार्टी ठेवली होती. गीतावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पार्टीत वाद झाल्यानंतर हिंसक वळण लागले. डीजेवर डान्स करणाऱ्या दोन गटांत बाचाबाची झाली. त्यानंतर गोळीबारही करण्यात आला. त्यात घासीकटरा येथील नितीश आणि मोहम्मद आमिर हे जखमी झाले. पाठीवर गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या नितीशला लखनऊ येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत शिवकुमार तिवारीची पत्नी गीता तिवारी चोरी आणि अनेक गंभीर गुन्ह्यांत तुरुंगात होती. २० ऑक्टोबरला ती जामिनावर सुटली होती. आपल्या नातीच्या घरी गीताने बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. यात अनेक गुन्हेगार सहभागी झाले होते. यातील अनेक जण गीतासाठी काम करतात.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times