पुणे: ‘संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व अनेक वर्षांनंतर जगात निर्माण झाले आहे. त्यांच्याकडे सर्वच विषयांवर मतं आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलणार,’ असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज हाणला. ( criticises )

पुण्यातील बोपोडी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्यात काल झालेल्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत यांनी विविध विषयांवर मतं मांडताना भाजपवर चौफेर टीका केली होती. काहींना विरोधी पक्षच असू नये असे वाटते, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला होता. तसंच, बिहार निवडणुकीत मोफत लस वाटपाचं आश्वासन देणाऱ्या भाजपला निवडणूक आयोगानं क्लीन चिट दिली आहे. त्याबद्दल विचारलं असता, निवडणूक आयोगाकडून यापेक्षा चांगली अपेक्षा करू शकत नाही. ती भाजपचीच एक शाखा आहे,’ असं ते म्हणाले होते.

वाचा:

राऊत यांच्या या आरोपांवर पाटील यांनी उपरोधिक टीका केली. ‘खासदार हे जगातील १८२ देशांचे प्रमुख आहेत. बऱ्याच वर्षानंतर या जगामध्ये त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व निर्माण झालं आहे. त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्रातील किंवा भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील विषयांवर मत आहे. त्यांच्याविषयी मी काय बोलणार, अशी असं पाटील म्हणाले.

वाचा:

‘भाजपवर टीका करणं ही संजय राऊत यांची ड्युटी आहे. ती ड्युटी ते व्यवस्थित पार पाडताहेत. मात्र, ते करताना इतरांनी केलेली टीका त्यांना आवडत नाही,’ असा आरोप पाटील यांनी केला. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांचा सल्ला घेतात हे संजय राऊतांनी मान्य केलंय. म्हणजे, पवार हेच सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं,’ असा दावाही पाटील यांनी केला.

वाचा:

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या नाराजीच्या वृत्तावरही पाटील यांनी भाष्य केलं. ‘महाविकास आघाडीत असे अनेक लोक नाराज आहेत. चव्हाण असोत, केसरकर असोत किंवा आणखी कोणी. या सगळ्यांची नाराजी काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी आहे,’ असं पाटील म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here