डॉ. अमित हंसराज गणवाणी (वय २६, रा. शासकीय कॅन्सर रुग्णालय परिसर) यांच्या मोबाइलवर दिल्लीतील एका भामट्याने संपर्क साधत पेटीएम खात्याचे करायचे आहे, असे सांगून डॉ. गणवाणी यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठविली. या लिंकवर पेटीएमचा पासवर्ड टाकून लॉगिन करण्यास सांगितले. संबंधित सायबर चोरट्याने पाठविलेल्या लॉगिन आयडीवर पेटीएम पासवर्ड टाकून लॉगिन करताच, गुणवाणी यांच्या खात्यातून तब्बल ४९ हजार ९९६ रूपये दिल्लीच्या एका बँक खात्यात वळते करून घेतले.
डॉ. गणवाणी यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या तक्रारीनंतर संबंधित सायबर चोराच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.
सायबर चोराचे खाते गोठवले
डॉ. गणवाणी यांच्या खात्यातून पैसे वळते होताच, त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दिल्लीतील बँकेशी संपर्क साधून सायबर चोराचे खाते गोठवले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times