राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या निवासस्थानांचे उद्घाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील देशमुख यांच्यासोबत होते. अमळनेर येथून कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या (एमएच १९ सीई १९) क्रमांकाच्या कारने अमळनेर येथून जळगावकडे जात होते. धरणगावपासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर खडसेंच्या कारचा डाव्या बाजूचा पुढचा टायर अचानक फुटला. यानंतर कार चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवल्याने कार उलटली नाही. त्यामुळे सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
या घटनेनंतर खडसे दुसऱ्या वाहनाने जळगावला रवाना
या घटनेची माहिती वार्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. या घटनेसंदर्भात खडसे यांनी सांगितले की, अमळनेर येथून कार्यक्रम आटोपून जळगावच्या दिशेने जात असताना आमच्या कारचा पुढचा टायर अचानक फुटला. परंतु सुदैवाने कार उलटली नाही. या अपघातात कोणतीही दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times