जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांच्या मानाने ऑक्टोबरमध्ये करोना उतरणीला आला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. आज राज्यात तब्बल ५ हजार ३६९ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे तर ११३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज सापडलेल्या करोना रुग्णांमुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १६ लाख ८३ हजार ७७५ इतकी झाली आहे.
राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २५ हजार १०९ इतकी आहे. पण, आता राज्यात करोनाची लाट ओसरत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही ९० टक्क्यांच्या जवळ आहे. आज ३ हजार ७२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आत्तापर्यंत १५ लाख १४ हजार ०७९ करोना बाधितांनी करोनाची लढाऊ यशस्विरीत्या जिंकली आहे. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट ८९. ९२ टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९० लाख २४ हजार ८७१ चाचण्यांपैकी १६ लाख ८३ हजार ७७५ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, सध्या राज्यात २५ लाख ४४ हजार ७९९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर, १२ हजार २३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times