राज ठाकरे यांची कला आणि क्रीडाबाबतची आवड तर सर्वांच्या परिचयाची आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी हल्ली नियमितपणे टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. शिवाजी पार्क जिमखान्यात रोज संध्याकाळी राज टेनिस खेळण्यासाठी जातात. आज मात्र त्यांच्यासोबत पुत्र अमित ठाकरे यांनीही त्यांना साथ देत टेनिसचा आनंद लुटला आहे. राज ठाकरे आणि अमित यांच्यात तब्बल दोन तास सामना रंगला होता. दोघा पिता- पुत्रामध्ये रंगलेल्या या टेनिस सामनाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. पण, या सामन्यात कोणी बाजी मारली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
करोनाच्या काळात राज ठाकरे त्यांच्या आरोग्याबाबत फार काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्क येथील टेनिस कोर्टवर ते रोज खेळायला देखील जात आहेत. यासाठी त्यांनी प्रशिक्षकही नेमला आहे. आज अमित ठाकरे हे देखील जिमखान्यात आल्यानं सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याला कारण ही तसंच आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times