सातारा: तालुक्यातील काळोशी येथील सूरज लक्ष्मण लामजे या २८ वर्षीय जवानाचा जम्मू-काश्मीरमधील येथे अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली आहे. सुरतच्या मृत्युने परळी खोऱ्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुरज हा २०१४ साली मुंबई येथे आयोजित लष्कराच्या भरतीत भरती झाला होता. त्यानंतर त्याचे बंगळुरू येथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. ते लडाख येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. सुरज हे चालक असल्याने शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास सैन्यदलातील साहित्य घेऊन जात असताना त्याची गाडी दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. मनमिळावू स्वभावाचे सुरज हा संपूर्ण काळोशी खोऱ्यात परिचित होता. त्याच्या निधनाने परळी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

लामजे यांचे पार्थिव रविवारी पुण्याहून साताऱ्याला आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचे मूळ गाव काळोशी येथे पार्थिव नेण्यात आले तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लामजे यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना आठ महिन्यांचा एक मुलगाही आहे. सूरज यांच्या निधनानं काळोशी गावात शोककळा पसरली आहे. सूरज यांच्या पाश्चात्त एख भाऊ, बहिण, आई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here