कटिहारः बिहार निवडणुकीत ( ) कन्हैया कुमार ( ) यांनी कटिहारमधील आजमनगर पोलिस ठाण्याच्या मैदानावर प्राणपूर विधानसभेचे कॉंग्रेस उमेदवार तौकीर आलम यांच्यासाठी जाहीर प्रचारसभा घेतली. जाहीर सभेतून त्यांनी नितीश सरकार आणि नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला.

लुटारू आणि लबाड सरकार ( ) बदलण्याचा मानस यावेळी बिहारमधील जनतेचा आहे. यामुळे या निवडणुकीनंतर या सरकारचा निरोप निश्चित आहे, असं कन्हैया कुमार म्हणाले. चिराग पासवान आणि एलजेपीवरही त्यांनी हल्ला चढवला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गेमप्लेन सर्वांना समजला आहे. यामुळे या सर्वांचा निरोप निश्चित आहे, असं कन्हैया कुमार म्हणाले.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि बिहारच्या राजकारणामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) चा प्रमुख चेहरा असलेले कन्हैया कुमार बिहारच्या निवडणुकीत प्रचार करत आहेत. बिहारमधील निवडणुकीच्या मुद्द्यांना दिशा देण्याचे काम आपला पक्ष यावेळी करत आहे, असं त्यांनी सांगितलं.

निवडणूक प्रचारादरम्यान डावे संघटनांच्या व्यासपीठावर का दिसत नाहीत आणि कन्हैया माकपला प्रोत्साहन देत नाहीत? असा प्रश्न त्यांना केला गेला. दुसर्‍या टप्प्यातील प्रचाराची जबाबदारी आपल्याला देण्यात आली आहे. करोनामुळे अद्याप कार्यक्रमाचे नियोजन झालेले नाही. बिहारमधील जनता करोनाला विसरले आहेत. पण करोना अजूनही आहे. म्हणूनच केंद्रीय नेतृत्वाचा कार्यक्रम अद्याप तयार झालेला नाही. प्रचार एक भाग आहे तर दुसरा भाग म्हणजे बूथ तयारी करणं. महाआघाडीची वारे राज्यात वाहत आहेत, असं कन्हैया कुमार म्हणाले. तेजस्वी यादवसोबत जाहिरसभेवर त्यांना प्रश्नावर केला गेला. ‘आमच्या कार्यक्रमाचे नियोजन वेगवेगळे आहे. आतापर्यंत तेजस्वीसोबत व्यासपीठावर येणाचा असा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही, असं कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here