राज्यातील सर्व हॉटेल, रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन केंद्र गेल्या महिन्यातच सुरु झाली आहेत. पर्यटन सहली देखील आता वेग घेत आहेत. पण गिर्यारोहणाला प्रशासनाकडून अद्याप परवागनी मिळाली नव्हती. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जिल्हाधिकाऱयांना पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहण, ट्रेकिंगला परवानगी मिळावी, असे निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱयांनी पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले, गड आणि कातळावरील मोहीमा सुरु करण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे.
पावसाळा आणि हिवाळा हा महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या मोहीमांसाठी लोकप्रिय काळ ठरतो. या वर्षी पावसाळ्यात करोनामुळे अनेकांना गडकिल्ल्यांवर चढाई करणे शक्य झाले नाही. आता दिवाळीच्या सुट्टूयांचे निमित्त करुन किल्लाप्रेमींची भ्रमंती सुरु होणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times