अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर आणि आयुक्त यांच्यावर टीका करणारी लाखो बनावट प्रोफाइल तयार केली आहेत. तसाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. अभिनेत्री यांचे बनावट ट्विटर अकाऊंट तयार करून त्यावर परमबीर सिंह यांचे मॉर्फ केलेले फोटो वापरून बदनामी करण्यात येत आहे. हे ट्विटर अकाउंट बोगस असून कुणीतरी विनाकारण आपली प्रतिमा खराब करत असल्याची तक्रार रविना टंडन यांनी सायबर पोलिसांत केली आहे.
मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर एक टोळी कार्यरत असून, लाखो फेक अकाऊंट उघडण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी दिली होती. याप्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. अभिनेत्री हिने दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट ट्वीट केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर तिच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच अभिनेत्री रविना टंडन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मराठी भाषा आणि मराठी भाषिकांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात होत्या. धार्मिक भावना दुखावतील, असेही अनेक संदेश होते. इतकेच नाही तर पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे फोटो वापरून अश्लील व्हिडिओ, संदेश, फोटो अपलोड करण्यात येत होते.
रविना टंडन यांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी आपण असे कोणत्याही प्रकारचे ट्विट केले नसल्याचे सांगितले. या प्रकारची शहानिशा केली त्यावेळी रविना टंडन यांच्या नावाने @ravenatondon हे बोगस ट्विटर हॅन्डल असून त्याआधारे हे सर्व पोस्ट केले जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे रविना टंडन यांनी सायबर पोलिसात ठाण्यात तक्रार केल्यानंतर याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times