मुंबई: ‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील’ अशी दर्पोक्ती करणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यावर शिवसेनेनं घणाघाती टीका केली आहे. ‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत. हे याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल,’ असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे. ( criticises Laxman Savadi)

१ नोव्हेंबर हा कर्नाटकचा स्थापना दिन आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. त्या पार्श्वभूमीवर सवदी यांनी महाराष्ट्राला डिवचणारे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा ”च्या अग्रलेखातून जोरदार समाचार घेण्यात आला आहे.

वाचा:

‘लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होते, त्याआधीपासून २० लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत. सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे. त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्या मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत व रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘सीमा भागातील २० लाख मराठी बांधवांवर काळा दिवस पाळण्याची वेळ कोणी आणली? भाषावार प्रांतरचना केल्यावर मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात जाण्याचा अधिकार का नाकारला गेला? २० लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का? हा अन्याय सूर्य- चंद्राच्या साक्षीनेच झाला. लोकशाहीत २० लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज ती काय?,’ असा संतप्त सवालही शिवसेनेनं केला आहे.

एखाद्या राज्याच्या स्थापना दिवसाला गालबोट लागू नये हे आमचेही मत आहेच, पण कर्नाटक त्याच्या हद्दीतील मराठी बांधवांशी ज्या निर्घृणपणे वागत आहे तो प्रकार संतापजनक आहे. तेथील मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी नाट्यगृहे, मराठी ग्रंथालये याबाबत अत्यंत अमानुष वर्तन स्वतंत्र भारतात केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तेथील मराठी बांधवांशी किमान माणुसकीने वागायला काय जाते? महाराष्ट्रातही लाखो कानडी बांधव आपले उद्योग-व्यवसाय करीत सुखाने राहत आहेत हे लक्ष्मण सवदीसारख्या मंत्र्याने विसरू नये. बेळगावात भगवे झेंडे पायदळी तुडवले जातात, छत्रपती शिवरायांचे पुतळे रातोरात उखडले जातात, मराठी भाषेतले फलक तोडले जातात हा मोगलाईचाच प्रकार आहे. महाराष्ट्रातील राज्यपालांनी या अत्याचारांविरोधात कर्नाटकातील राज्यपालांशी कडक शब्दांत बोलायला हवे. किमानपक्षी राज्यपालांनी बेळगावच्या शिष्टमंडळास पंतप्रधान मोदींची वेळ मिळवून द्यायला मदत केली पाहिजे,’ अशी अपेक्षाही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी का भिजले नाही?

‘सीमा भागातील जनतेला पाठिंबा म्हणून १ नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी दंडास काळ्या फिती बांधून काम केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील भाजपसह इतर राजकीय पक्षही सामील झाले असते तर मराठी ऐक्याचे जोरदार दर्शन कानडी राज्यकर्त्यांना घडले असते. निदान दोन विरोधी पक्षनेत्यांनी तरी दंडास काळ्या फिती बांधून मराठी जनांच्या भावनेचा मान राखायला हवा होता. कर्नाटकात भाजपचे राज्य आहे व त्या राज्यात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असतील तर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी भिजलेच पाहिजे. तसे का झाले नाही हे त्यांनाच माहीत,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here