रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने माहिती दिली आहे की, ३१ डिसेंबर पर्यंत जिओच्या ग्राहकांची संख्या ही ३७ कोटींपर्यंत पोहोचली आहे. गेल्या १२ महिन्यात जिओने १३ कोटी ५७ लाख ग्राहक जोडले आहेत. तर एक कोटी ४८ लाख नवीन ग्राहक गेल्या तिमाहीत जोडले आहेत. या तिमाही दरम्यान जिओचा प्रति महिना प्रति सब्सक्राइबर युजर १२८.४ रूपये इतका राहिला आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १२७.५ रुपये होता. आययूसी टॅरिफ लागू झाल्यानंतर २ महिन्यात अॅक्सिसला फायदा झाला आहे. या तिमाहित जिओ ग्राहकांनी एकूण १ हजार २०८ कोटी जीबी डेटाचा वापर केला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहित ३९.९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या तिमाहित जिओच्या ग्राहकांनी ८२,६४९ कोटी मिनिट्स मोबाइलवर चर्चा केली. म्हणजेच या तिमाहीत ३०.३ टक्क्याचा फायदा झाला आहे. या तिमाहित जिओच्या ग्राहकांनी प्रत्येक महिन्याला ११.१ जीबी डेटाचा वापर केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times