वृत्तसंस्था, नवी दिल्ली : नुकताच पार पडलेला नवरात्री उत्सवात देशातील वाहन उद्योगाला दिलासा मिळाला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स या मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या वाहनांच्या चांगली विक्री झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून संकटात असलेल्या वाहन उद्योगात काहीसे चैतन्य निर्माण झाले आहे.

वरील तीन कंपन्यांप्रमाणेच किया मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र तसेच होंडा कार्स इंडिया या कंपन्यांनाही फायदा झाला आहे. नवरात्रोत्सव आणि त्याच्या शेवटी येणारा दसरा हा संपूर्ण काळ नव्या वस्तूंच्या खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्याचाच फायदा या सर्व कंपन्यांना मिळाला आहे. करोनामुळे लांबणीवर टाकलेली वाहनखरेदीची इच्छा ग्राहकांनी या उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण केली आहे.

नवरात्रोत्सवातील वाहनविक्री


मारुती सुझुकी इंडिया : ९६,७०० कारची विक्री. रिटेल विक्रीत २७ टक्के वाढ. गेल्यावर्षी याच काळात ७६ हजार कारची विक्री.


ह्युंदाई मोटर इंडिया : २८ टक्के विक्रीवाढीसह २६,०६८ कारची विक्री.


टाटा मोटर्स : गेल्यावर्षी ५,७२५ कार विकल्या. मात्र, यंदा ९० टक्के वाढ नोंदवत १०,८८७ कारची विक्री.


किया मोटर्स इंडिया : घसघशीत २२४ टक्के वाढ नोंदवत ११,६४० कारची विक्री.


टोयोटा किर्लोस्कर : पाच हजार कारच्या विक्रीसह १३ टक्के वाढीची नोंद.


महिंद्र अँड महिंद्र : एसयूव्ही गटातील कारच्या विक्रीत ४१ टक्के वाढ.


होंडा कार्स इंडिया : कारविक्रीत १० टक्के वाढ.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here