म. टा. प्रतिनिधी, : मैत्रिणीसमोर शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यावरून सुरुवातीला झालेल्या हाणामारीचे रूपांतर शहरभर धुडगूस घालण्यापर्यंत गेले. यामध्ये दोन गटांतील १०० जण सहभागी झाले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. हा प्रकार शुक्रवारी घडला होता.

महेशनगर चौकातील चौपाटीवरून या प्रकरणाला सुरुवात झाल्यानंतर नेहरूनगर, अजमेरा कॉलनी, खराळवाडी या भागांत दोन गटांतील १०० जणांनी धुडगूस घातला. संत तुकारानगर, पिंपरी येथील महेशनगर चौकात चौपाटी आहे. तेथे एक युवक आणि त्याची मैत्रिण खाद्यपदार्थांच्या गाडीवर थांबले होते. तेव्हा त्या युवकाने मैत्रिणीच्या अन्य एका मित्राला शिवीगाळ केली. तेव्हा तेथे आणखी एक जण होता. त्याने माझ्या मित्राला मुलीसमोर कशाला शिवीगाळ करतो, असा जाब विचारला. त्यावरून तेथे हाणामारी झाली. याची माहिती अजमेरा, नेहरूनगर, खराळवाडी येथे राहणाऱ्या मित्रांमध्ये पसरली. त्यानंतर सुरुवातीला ज्याला मारहाण झाली त्याचा बदला म्हणून काही जणांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर याचा बदला म्हणून नेहरूनगर येथे १०० जणांच्या टोळक्याने तोडफोड केली.

ज्या लोकांनी नेहरूनगर परिसरात तोडफोड केली, त्याच्या अजमेरा कॉलनीतील घराजवळ जाऊन नेहरूननगर येथील मुलांनी दोन बसची तोडफोड केली. तसेच, त्याच्या घरातील वृद्धाच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावून नेण्यात आली. या प्रकारानंतर या टोळक्याने आपला मोर्चा खराळवाडी परिसरात वळविला. तेथे एका घरात घुसून तोडफोड केल्यावर हे टोळके पांगले.

अवघे चार पोलिस अधिकारी

पिंपरी पोलिस ठाण्यात सध्या केवळ चार पोलिस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे तीन पोलिस चौक्या आणि पोलिस ठाण्यात एक असे अधिकारी नेमल्यावर तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवरच सर्व कामकाज चालविण्याची कसरत सध्या पिंपरीच्या निरीक्षकांना करावी लागत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here