: कमी किंमतीत आयफोन मिळत असल्याच्या नादात युवकाने तब्बल चार लाख ६६ हजार रुपये गमावले. ही घटना एमआयडीसीतील इसासनी भागात उघडकीस आली. शेषनाथ मनी यादव (वय २५) याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शेषनाथ याचे आयटीआय पूर्ण झाले. शेषनाथ याचे वडील वेकोलिचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांचा व्यवहार शेषनाथ हा बघतो. काही दिवसांपूर्वी शेषनाथ याच्या मोबाइलवर दिनेश गुप्ता याने संपर्क साधला. सीटी कार्ड २४ डॉट कॉममधून बोलत आहे. या बेवसाइटवरून उत्पादन बुक केल्यास मोठी सूट मिळेल, असे आमिष त्याने दाखविले. शेषनाथने ब्ल्यूटुथ बुक केले. त्यानंतर दिनेशने पुन्हा शेषनाथच्या मोबाइलवर संपर्क साधला. आणखी एक उत्पादन बुक करण्यास सांगितले. शेषनाथने आयफोन बुक केला. दिनेशने आयफोनच्या विम्यासाठी फोन पेद्वारे पैसे पाठविण्यास सांगितले. शेषनाथने पैसे पाठविले. त्यानंतर दिनेश याच्या सांगण्यावरून शेषनाथ हा सतत पैसे पाठवायला लागला. अशाप्रकारे दिनेशने शेषनाथची चार लाख ६६ हजार रुपयांनी फसवणूक केली.

४५ लाखांची गंडा

नागपूर : बनावट दस्तऐवजद्वारे ४५ लाखांची फसवणूक करण्यात आली. मुकेश धृवकुमार मेश्राम (वय ४०, रा. न्यू बॅनर्जी ले-आऊट, भगवाननगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी शिवदास श्रीराम इंगळे (वय ४५, रा. न्यू सुभेदार ले- आऊट) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

२००९मध्ये मेश्राम यांना शेती खरेदी करायची होती. शिवदास हा मेश्राम यांना भेटला. मनोज यादव यांची इसासनीतील शेती विकायची असल्याचे सांगितले. मुकेश मेश्राम यांनी २५ लाख रुपयांमध्ये शेती खरेदी केली. या शेतीतील १.१६ हेक्टर भागाचे आममुखत्यारपत्र मेश्राम यांनी शिवदासच्या नावे करून दिले. या मोबदल्यात त्यांनी शिवदास याच्याकडून पैसे घेतले नाही. या आधारे बनावट दस्तऐवज तयार करून शिवदासने मेश्राम यांची एकूण ४५ लाख रुपयांनी फसवणूक केली. शेती स्वत:च्या नावे केली. फसवणूक झाल्याने मेश्राम यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here