पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी धरमपेठ भागात राहाते. मार्च २०१८मध्ये तिची नीलेशसोबत फेसबुकवर ओळख झाली. नीलेशने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तरुणीला दारू पाजली. त्यानंतर नीलेश हा तरुणीला घेऊन वेलकम सोसायटी येथे आला. तेथेही तिला दारू पाजली. तरुणी बेशुद्ध झाली. नीलेशने तिच्यावर अत्याचार केला. तरुणी शुद्धीवर आली. तिने नीलेशला जाब विचारला. नीलेशने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करायला लागला. तरुणी गर्भवती राहिली. नीलेशने तिचा गर्भपात केला. काही दिवसांपूर्वी त्याने तरुणीला लग्नास नकार दिला. तरुणीने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नीलेशचा शोध सुरू केला आहे. नीलेशचे वडील निवृत्त तहसीलदार असल्याचीही चर्चा आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times