मुंबई शहरात कधीच कोणाला उपाशी पोटी झोपावं लागू नये म्हणून मनसेनं हा उपक्रम सुरू केला आहे. ‘या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील शिजवलेलं अन्न, फळे, ब्रेड, बिस्किटं यापैकी जे काही आपल्याकडं असेल ते स्वेच्छेनं या फ्रीजमध्ये आणून ठेवायचं आहे. ज्या कोणाला गरज असेल, ज्यांना भूक असेल त्यांनी येऊन हे अन्न घेऊन जायचं आहे, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. ही संकल्पना यशस्वी झाल्यास शहरातील कोणालाही उपाशी पोटी झोपावं लागणार नाही, असा विश्वास नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. असे अनेक फ्रीज येत्या काळात मनसेच्या माध्यमातून सुरू केले जातील, असं त्यांनी सांगितलं.
वाचा:
मनसेच्या माहीम येथील कार्यालयात या फ्रीजचं उद्घाटन नुकतंच झालं. गरिमा फाउंडेशन, आपलं माणूस प्रतिष्ठान आणि एनईएसएचचं सहकार्य या उपक्रमास लाभलं आहे. ‘मुंबईच्या स्पिरिटवर आम्हाला विश्वास आहे. लोकांचा सहभाग या उपक्रमात आम्हाला नक्कीच मिळेल,’ असा विश्वासही सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times