मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री करोनावर मात करून ठणठणीत बरे झाले असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

करोनाच्या काळात अजित पवार सासत्याने दौरे व बैठका घेण्यात व्यस्त होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर ते सर्वतोपरी काळजीही घेत होते. राज्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर त्यांनी घरीत विश्रांती घेत घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला होता. थकवा अधिक वाढल्यानं त्यांनी खबदरीचा उपाय म्हणून करोनाची चाचणी करुन घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, उपचारांनंतर अजित पवार यांचा करोनाचा अहवाल आता निगेटिव्ह आला असून त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. उपचारांनंतर ते करोनामुक्त झाले असून त्यांना आजच ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. घरी परतल्यानंतर ते आठ दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर, डॉक्टर व कार्यकर्त्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

7 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here