दि म्युनिसिपल युनियनने पालिकेच्या सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना २०१९-२०च्या वर्षातील उत्पन्नाच्या २० टक्के इतका बोनस देण्याची मागणी केली होती तर, म्युनिसिपल मजदूर संघाने ५० हजार रुपये बोनसची मागणी केली होती. मात्र, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात आला होता. त्यानंतर आज किशोरी पेडणेकर यांनी कामगारांचा बोनस जाहीर केला आहे. पालिका कामगारांना १५ हजार ५००, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७७५०, मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना ४७०० आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षणांना २३५० रुपये बोनस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक आरोग्य स्वयंसेविका यांना भाऊबीजेची भेट म्हणून ४ हजार ४०० रुपये देण्यात येणार आहेत.
महापौरांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार पालिका कामगारांच्या बोनसमध्ये यंदा फक्त ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर, बोनसमुळं पालिकेच्या तिजोरीवर १५५ कोटींचा बोजा येणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times