नवी दिल्लीः काश्मीरमध्ये घाणेरडे सिनेमे पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो, असे खळबळजनक वक्तव्य आयोगाचे सदस्य यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरमधून हटवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहावी, म्हणून काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. ही इंटरनेट सेवा हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच व्ही. के. सारस्वत यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सर्व नेते काश्मीरमध्ये कशासाठी का जाऊ इच्छितात?, असा सवाल उपस्थित करत, राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर ज्याप्रमाणे आंदोलने सुरू आहेत. तशीच आंदोलने त्यांना काश्मीरमध्ये घडवून आणायची आहेत, असा दावा सारस्वत यांनी यावेळी केला.

आंदोलनाचे लोण पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. काश्मीरमध्ये इंटरनेट नसेल, तर काहीही फरक नाही. काश्मीरमधील लोकं इंटरनेटवर घाणेरडे चित्रपट पाहण्याशिवाय दुसरे काहीच करत नाही, असे वादग्रस्त विधान सारस्वत यांनी यावेळी केले.

या विधानावर वाद निर्माण झाल्यावर सारस्वत यांनी सारवासरव केली आहे. माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. काश्मिरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागतो. काश्मिरी नागरिकांना मिळणाऱ्या इंटरनेट सुविधेच्या विरोधात मी नाही. इंटरनेट वापरण्याचा हक्क सर्वांनाच आहे, असे सारस्वत यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या ५ महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये बंद असलेली प्रीपेड मोबाइल सेवा सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण जम्मू विभागात पोस्टपेड मोबाइलवरील २ जी सेवा, तर काश्मीर विभागातील कुपवाडा आणि बांदीपोरा या दोन जिल्ह्यामध्ये पोस्टपेड मोबाइलवरील २ जी सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील सर्व स्थानिक प्रीपेड सिम कार्ड्सवरील व्हाईस कॉल आणि एसएमएस सेवाही पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here