वेलिंग्टन: न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्ना यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली असून खातेवाटप जाहीर केले आहे. अर्डर्न यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन यांची वर्णी लागली आहे. न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या प्रियंका या पहिल्याच भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत.

भारतात जन्म झालेल्या प्रियंका राधाकृष्णन यांचे शिक्षण सिंगापूरमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी न्यूझीलंड गाठले. प्रियंका यांनी न्यूझीलंडमध्ये महिलांवर होणारे घरगुती हिंसाचार आणि शोषण होत असलेल्या परदेशी कामगारांच्या न्याय, हक्कासाठी आवाज उठवला. या घटकाच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले जात असत. मजूर पक्षाच्या माध्यमातून २००४ पासून सक्रिय राजकारणात आहेत. मजूर पक्षाकडून त्यांनी पहिल्यांदा २०१७ मध्ये निवडणूक लढवली आणि त्यात विजयी झाल्या होत्या. प्रियंका राधाकृष्णन यांच्याकडे युवक मंत्रालय, विविधता, समावेश आणि वांशिक समुदाय यांच्याशी निगडीत असलेल्या खात्यांची जबाबदारी असणार आहे. प्रियंका राधाकृष्णन या मूळच्या केरळमधील असून त्यांचे आजोबा कोचीतील प्रसिद्ध डॉक्टर होते. त्याशिवाय केरळच्या कम्युनिस्ट पक्षातही सक्रिय होते.

डॉक्टर गौरव शर्मा खासदार

न्यूझीलंडच्या संसदेत आणखी एक भारतीय वंशाची व्यक्ती संसदेत दाखल झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील डॉ. गौरव शर्मा हे २० वर्षांपूर्वीच न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. गौरव शर्मा यांनी हॅमिल्टनमधून मजूर पक्षाकडून निवडणूक जिंकली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे केली असल्याचे अर्डर्न यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील सहकारी हे कार्यक्षमता आणि कौशल्याने परिपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची बढती झाली असून न्यूझीलंडच्या जनतेने दिलेल्या जनमताचे प्रतिबिंब आमच्या मंत्रिमंडळात उमटले असल्याचे त्यांनी म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here