लॉकडाऊननंतर राज्यात मिशन बिगीन अंतर्गंत अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. लग्न समारंभाचे आयोजन मंगल कार्यालयात करण्याची परवानगी राज्य शासनाकडून यापूर्वीच देण्यात आली होती. ५० जणांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर पाळून मंगलकार्यालयात लग्न सोहळ्याचे आयोजन याआधी करता येत होते. मात्र आता या संख्येत अधिक वाढ करण्याचा विचार सरकार करत आहेत. दिवाळीनंतर यावर सरकार निर्णय घेणार असल्याचं, राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दिवाळीनंतर राज्यात लग्न कार्यांना सुरुवात होती. मागील वर्षी ऐन मार्च महिन्यातच करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानं अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलले होते. त्यामुळं या दिवाळीनंतर लग्न सोहळ्याची लगबग सुरू होईल. याच पार्श्वभूमीवर सरकारने याबाबत निर्णय घेण्याचा विचार केला आहे.
‘ अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली सरकारने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांना पालन करावे. मास्क वापरणं गरजेचं आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क महत्त्वाचं असणार आहे,’ असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी
काही युरोपियन देशात करोनाची दुसरी लाट आल्यामुळं पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. त्यामुळं आपल्याकडेही करोनाची लाट येईल का? अशी सवाल उपस्थित केला जात आहे. पण आपल्याकडे करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे आणि जरी करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असली तर आपण परिस्थितीला हाताळण्यासाठी सज्ज आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times