मथुराः उत्तर प्रदेशात मथुरेतील एका मंदिरात नमाज पठण केल्याने वाद निर्माण झाला आहे. मथुरेतील नंद बाबा मंदिरात फसवून नमाज पठण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मथुरेतीलच्या नंद बाबा मंदिरात चार जण आले होते. यापैकी दोन जणांनी मंदिरातील सेवकांची दिशाभूल केली आणि मंदिर परिसरातच नमाज पठाण केलं. २९ ऑक्टोबरला ही घटना घडलीय. याप्रकरणी आता बरसाना पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी युपी पोलिसांनी आरोपी फैसल खानला दिल्लीतून अटक केलीय. आपण फसवून नमाज पठण केले नाही. तर मंदिरात उपस्थित अनेकांसमोर नमाज पठण केलं. काहीही चूक केलेली नाही, असं फैजल खानने म्हटलंय.

मंदिर प्रशासनाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दिल्लीहून दोन जण मंदिरात आले होते. त्यांनी परवानगीशिवाय मंदिर परिसरात प्रवेश केला आणि नमाज पठण केलं आणि आपले फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यांच्या फोटोंमुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे. मंदिरातील सेवकांच्या तक्रारीवरून आरोपी फैजल खान, त्याचा मुस्लिम मित्र आणि दोन हिंदू साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक श्रद्धेला ठेच पोहोचवणं, दोन धर्मांमध्ये कटुता निर्माण करणं, भय निर्माण करणं आणि सामाजिक सौहार्दाचे वातवरण बिघडवण्याचा प्रयत्न आणि धर्मिक स्थळ अपवित्र करणं अशा आरोपांखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

यांनी मंदिरातील फोटोंचा गैरवापर करू नये आणि त्यांना विदेशी संस्थांकडून यासाठी निधी तर मिळत नाहीए ना, अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. या प्रकरणी लवकर चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मथुरेत कृष्ण जन्मभूमी आणि जवळच बांधलेली मशिदीचे प्रकरण कोर्टात पोहोचले असताना तिथे असा प्रकार उघडकीस आला आहे. अलिकडेच काही संघटनांनी येथील शाही ईदगाह मशिद हटवण्याची मागणी केलीय. या प्रकरणी मथुरा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली असून नोव्हेंबरमध्येच त्यावर सुनावणी होणार आहे.

या प्रकरामागे कट?

या प्रकारामागे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा कट असल्याचं भाजप सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा, मोहसीन रझा यांनी म्हटलं आहे.

‘कृष्ण सर्वांचे आहे, आमचीही श्रद्धा’

‘कृष्ण फक्त तुमचे आहेत का? कृष्ण सर्वांचे आहेत’ असं मंदिरात आल्यावर आरोपी फैजल पुजार्‍याला म्हणाला. फैजलने रामायण काही घटनांचा उल्लेख केला आणि तिथे उभे असलेल्या भाविकांना ऐकवल्या. आम्ही दिल्लीवरून सायकलने प्रवास करत येथे यात्रा करत आलो आहोत. दर्शन आणि चर्चेनंतर मंदिराच्या पुजाऱ्याने त्यांना प्रसादही दिला. यानंतर हे चारही तरुण मंदिर परिसरात फिरत पुढे निघून गेले.

‘दर्शनावेळी झाली नमाजची वेळ’

नंद भवनात पोहोचलेल्या तरुणांपैकी एकाने स्वतःची ओळख दिल्लीतील रहिवासी फैजल खान अशी केली. प्रसिद्ध कवी रसखानप्रमाणेच आपलीही श्रीकृष्णावर खूप श्रद्धा आहे आणि त्या प्रभावातून ब्रज चौरासी कोसची यात्रा करत आहोत. प्रवासादरम्यान सर्व तीर्थक्षेत्रांनाही भेट देत आहेत. आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. यादरम्यान नमाजची वेळ आली. यामुळे आम्ही तिथे नमाज पठण केलं, असं आरोपी तरुणाचं म्हणणं आहे.

‘बंधुभावाचे उदाहरण’

मथुरेतील मंदिरात नमाज पठणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंदिरात नमाज पठणाचे फोटो समोर आल्यानंतर हिंदू नेते आणि मंदिरातील इतर जण संतप्त झाले आहेत. तर हे बंधुभावाचे उत्तम उदाहरण आहे, असं कौमी एकता मंचने म्हटंल आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here