साताराः मराठा समाज हा एकत्र येत नाही ही सर्वात मोठी खंत असल्याची भावना सातारा व जावली तालुक्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली. सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय गोलमेज परिषदेत बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. यावेळी ते पुढे म्हणाले की

‘सर्वांनी एकत्र यावे मराठा आरक्षणासाठी जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आज गरज आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली ही मराठ्यांची ताकद आहे. मराठा आरक्षणासाठी निर्णायक भूमिका घेण्यासाठी मराठा संघटनांकडून रान उठवले जात आहे याचाच एक भाग म्हणून आज ही गोलमेज परिषद साताऱ्यात होत आहे. मराठा आरक्षणावरून समाजातील युवक वर्गात नाराजीचे वातावरण आहे. आरक्षण लढा आपणाला जिंकायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे सर्व संघटनांनी एकत्र आलेत तरच लढा जिंकला जाऊ शकतो दुर्दैवाने आपण सर्वजण एकत्र येत नाहीत, असंही ते म्हणाले.

‘ते पुढे म्हणाले ज्यांना आरक्षणाविषयी माहिती आहे. ज्ञान आहे त्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मी येथे लोकप्रतिनिधी म्हणून न येता मराठा म्हणून येथे आलो आहे. इतर समाजातील आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी नसून आमचे आहेत तेच आम्हाला द्या,’ असेही शिवेंद्रराजे यावेळी म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here