नागपूर: मुख्यमंत्री () आणि राज्याचे मंत्री () यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत ट्विट करणाऱ्या () याला नागपूर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी समितला पोलिसांनी राजकोट येथून अटक केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत टीका करणारे ट्विट केल्याचा आरोप समितवर आहे. समीतविरोधात नागपुरातील नितीन तिवारी यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्याला पोलिसांनी २४ ऑक्टोबर रोजी राजकोट येथून अटक केली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज, सोमवारी त्याची पोलीस कोठडीची मुदत संपली. आज, त्याला अखेर कोर्टाने जामीन मंजूर केला.

ठक्करचे ट्विटरवर ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषेत ट्वीट करणाऱ्या समीत ठक्कर सोशल मीडियावर सक्रिय आहे. तो पदवीधर आहे. त्याचे ट्वीटरवर ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अमृता फडणवीसांनी केली होती महाविकास आघाडी सरकारवर टीका

समीत ठक्करला पोलिसांनी अटक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. करोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन्ही विषाणू कधी, कसे आणि कुठे निष्पाप लोकांना ग्रासतील हे सांगता येत नाही. क्वारंटाइन होण्यापासून आपला बचाव करा. त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवून नियमित मास्क वापरा. गप्प बसा, असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here