‘मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही काही गैरसमज पसरवत आहेत. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावण्याचं काही राजकीय पक्षांचं हे कारस्थान आहे. या आंदोलनांमध्ये कोणत्या पक्षाचे लोक आहेत हे तुम्ही पाहा,’ असं टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
‘मागच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आमच्या सरकारचीही तीच भूमिका आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यावर आमचा भर आहे. त्यामुळं ओबीसींच्या आरक्षणात ढवळाढवळ करण्याचा प्रश्नच येत नाही,’ असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
‘मराठा आरक्षणाला न्यायालयानं स्थगिती दिली आहे सरकारने नाही, असं सांगतानाच त्यांनी सरकारला विरोध करण्यापेक्षा न्यायालयात मदत करा. आंदोलनापेक्षा चांगले मुद्दे आणि वेगळे मुद्दे तुमच्याकडे असेल तर ते सांगा आम्ही न्यायालयात बाजू मांडू,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times