पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीच्या ( ) दुसर्‍या टप्प्यातील मतदान ३ नोव्हेंबरला ( bihar polling ) होणार आहे. यासाठीचा प्रचार संपला आहे. पण तिसर्‍या टप्प्यातील जागांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दल (JDU) आणि विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत.

१० लाख नोकऱ्या देण्याचं आरजेडीचं आश्वासन हे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. १० लाख नोकऱ्यांसाठी १ लाख ४४ हजार कोटींची आवश्यकता आहे. एवढा निधी कुठून आणणार? असा प्रश्न नितीशकुमार यांनी केला. आता मुख्यमंत्री नितीश यांच्या वक्तव्यावर आरजेडी नेते यांनी पलटवार केला आहे.

सरकाऱ्याच्या बजेटमधील ८० हजार कोटी रुपये खर्च होत नाहीत. यानंतरही १० लाख तरुणांना नोकरी उपलब्ध देण्यासाठी निधीची कमतरता असेल तर मुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व आमदारांचे पगार कापले जातील, असं तेजस्वी यादव म्हणाले. तेजस्वी यादव यांनी बेरोजगार तरुणांना १० लाख सरकारी नोकरीचं आश्वासन दिल्यानंतर आता विद्यार्थ्यांना आपल्या सांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

तेजस्वी यांनीही शिक्षण कर्ज माफ करण्याचीही घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास ५ लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल. याशिवाय दोन नवीन विद्यापीठांची स्थापन करण्याचीही घोषणाही तेजस्वी यादव यांनी केलीय. बेगुसरायमध्ये राष्ट्रकवी दिनकर आणि मिथिलांचलमध्ये जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या नावावर विद्यापीठ स्थापन केले जाईल, असं तेजस्वी यांनी म्हटलं आहे.

आरजेडीची आश्वासनं ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पात यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, असं मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले. तसंच जे १० लाख नोकऱ्या देण्याची भाषा करत आहेत त्यांच्या १५ वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात संयुक्त बिहारमध्ये फक्त ९५ हजार नोकर्‍या देण्यात आल्या होत्या, असं नितीशकुमार म्हणत नितीशकुमार यांनी आरजेडीवर जोरदार टीका केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here