मुर्शिदाबादः देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. मुर्शिदाबाद येथील ३२ वर्षीय अब्दुल मोमीन मंडल हा दहशतवादी संघटना अल कायदासाठी काम करायचा. पश्चिम बंगाल आणि केरळमधील अल कायदाच्या एका प्रकरणात एनआयएने त्याला अटक केली आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याच्या कटात मंडल सामील होता.

आरोपी अब्दुल मोमीन मंडल पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रायपूर दारूर हुडा इस्लामिया मदरशामध्ये शिक्षक म्हणून काम करत असल्याचं तपासात समोर आलं आहे. अल-कायदाच्या मॉड्यूलमधील सदस्यांनी बोलवलेल्या बैठकीत तो सहभागी होता. तो संघटनेसाठी तरुणांची भरती करण्याचा प्रयत्न करत होता आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करत होता, असं एनआयएने म्हटलं आहे.

एनआयएने रविवारी मंडलची झडती घेतल्यानंतर अनेक डिजिटल उपकरणं आणि इतर वस्तू जप्त केल्या. एनआयएने आतापर्यंत या प्रकरणी ११ आरोपींना अटक केली आहे. आरोपी अब्दुल मोमीन मंडल याला सोमवारी मुर्शिदाबादच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला नवी दिल्लीला नेण्यासाठी घेतलेला ट्रान्झिट रिमांड मंजूर झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here