आबुधाबी : वारट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाला आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही आरसीबीच्या संघाने प्ले-ऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. हे नेमकं कसं घडलं, काय होतं समीकरण पाहा…

आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दिल्लीपुढे १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग दिल्लीच्या संघाने केला. या सामन्यानंतर आरसीबीच्या संघाची दुसऱ्या स्थानावरून घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. पण तरीही आरसीबीचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचला. यावेळी १७.३ षटकांचे आव्हान आरसीबीच्या संघाकडे होते. आरसीबीला १७.३ षटकांपर्यंत दिल्ली विजय मिळवू द्यायचा नव्हता आणि हेच समीकरण यावेळी महत्वाचे ठरल्याचे पाहायला मिळाले.

जर दिल्लीने विजयासाठीच्या १५३ धावा या १७.३ षटकांपूर्वी केल्या असत्या तर आरसीबीचे प्ले-ऑफमधील स्थान डळमळीत होऊ शकले असते. पण आरसीबीचा पराभव झाला असला तरी त्यांनी दिल्लीने हे आव्हान १९ षटकांमध्ये पूर्ण केले. त्यामुळेच या सामन्यानंतर दिल्ली आणि आरसीबी या दोन्ही संघांनी प्ले-ऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे.

या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ हा तिसऱ्या स्थानावर विराजमान होता. या लढतीपूर्वी दिल्लीच्या संघाने १३ सामने खेळले होते. या १३ सामन्यांमध्ये त्यांनी सात विजय मिळवले होते, तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण आजच्या सामन्यात त्यांनी आरसीबीचा पराभव केला. या विजयासह दिल्लीने दोन गुणांची कमाई केली. या दोन गुणांसह दिल्लीने गुणतालिकेत आरसीबीला धक्का देत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता दिल्लीचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर क्वालिफायर्स-१मध्ये होणार आहे.

या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ हा दुसऱ्या स्थानावर विराजमान होता. या लढतीपूर्वी आरसीबीच्या संघाने १३ सामने खेळले होते. या १३ सामन्यांमध्ये त्यांनी सात विजय मिळवले होते, तर सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण आजच्या सामन्यात आरसीबीला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या सामन्यानंतर आरसीबीचे १४ गुणच राहीले आहेत. पण तरीही आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या पराभवानंतरही आरसीबीचा संघ तिसरे स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here