मुंबई: मुंबईत दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्यास बंदी असताना विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा दुचाकीस्वारांवर मुंबई पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईमुळे रॅपिडोची ‘ ‘ सेवा अडचणीत आली आहे. विनापरवाना कोणीही दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ( Latest News Updates )

वाचा:

या कंपनीने मुंबईमध्ये दुचाकी प्रवासी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. रॅपिडो कंपनीने ॲपच्या माध्यमातून इच्छूक चालकांची नोंदणी करून बाइक टॅक्सी सेवेला प्रारंभ केला. कोणत्याही वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून परवाना मिळविणे आवश्यक असते. मुंबईत दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही कंपनी ही सेवा देत असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे येऊ लागल्या. त्याअनुषंगाने मुंबईतील ३४ वाहतूक पोलीस चौक्यांना अशा बेकायदा बाइक टॅक्सींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

वाचा:

सांताक्रूझ, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने रॅपिडो कंपनीच्या ६ दुचाकी चालकांना ताब्यात घेण्यात आले. या सहा जणांकडे प्रवासी वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली. मात्र सर्वांनी रॅपिडो कंपनीकडे बोट दाखविले. त्यामुळे विनापरवाना वाहतूक करणाऱ्या या सहा दुचाकी चालकांवर पोलिसांनी कलम ६६ (१), सहकलम १९२ (अ) अंतर्गत कारवाई केली. रॅपिडो या ऑनलाइन ॲपला शासनाची मान्यता नसून कुणीही या ॲपच्या माध्यमातून बाइक टॅक्सी बुक करू नये अथवा आपल्या दुचाकीचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करू नये. तसे करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here