जळगाव: राज्यभरात भाजपचे असंख्य कार्यकर्ते नाराज आहेत. या नाराजीमुळे ते राजीनामे देत असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी आज भाजपावर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले. ( targets )

वाचा:

जळगावातील मुक्ताई निवासस्थानी एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना अहमदनगर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याबाबत विचारणा केली असता, खडसे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत. कार्यकर्त्यांच्या नाराजीचाच हा परिणाम आहे, असे खडसे यांनी सांगितले.

विधान परिषदेबाबत म्हणाले ‘जय श्रीराम’

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या संभाव्य नावांबाबत खडसे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. यांच्या नावाची चर्चा आहे. अॅड. खडसे या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जळगाव शाखेच्या अध्यक्षा असल्याने कला व साहित्य क्षेत्रातून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत खडसेंनी फक्त ‘जय श्रीराम’ एवढीच प्रतिक्रिया दिली.

वाचा:

प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून खडसेंच्या भेटी

एकनाथ खडसे राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी राज्याच्या सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील चित्र बदलू लागलं आहे. गेले काही दिवस प्रशासनावर खडसेंच्या वाढत्या कमांडची चर्चा आहे. या आठवड्यात महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, एलसीबीतून नुकतेच बाहेर पडलेले पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी खडसेंची भेट घेतली. आज पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी विकास पाटील हेसुद्धा खडसे यांच्या भेटीसाठी पोहचले. खडसेंनी दोन्ही अधिकाऱ्यांसोबत काही मिनिटे बंद दाराआड चर्चा केली.

यांचे खडसेंना प्रत्युत्तर

भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसे आता आमच्या पक्षातून गेले आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता आमच्या कार्यकर्त्यांची काळजी त्यांनी करू नये. भाजपचे कार्यकर्ते आहेत त्याच ठिकाणी आहेत. कार्यकर्त्यांची बांधिलकी पक्षाशी, पक्षाच्या विचारांशी आहे कोणत्याही व्यक्तीशी नाही. त्यामुळे पक्षाला भगदाड पडेल किंवा पोकळी निर्माण होईल, असे वाटून घेण्याचे कारण नाही, असा टोला महाजन यांनी लगावला. भाजप आहे त्याच ठिकाणी आहे. उलट येत्या काळात जळगाव जिल्ह्यात व सगळीकडेच पक्ष जोमाने वाढेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here