म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अभिनेता आमिर खानची मुलगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट करत असते. अलिकडेच तिने ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ती देखील कधीकाळी नैराश्यामध्ये होती, असे तिने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. परंतु इरा नैराश्यात का होती? असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. त्या प्रश्नाचे उत्तर तिने दिले आहे. १४ वर्षांची असताना तिच्यावर झाले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट तिने स्वतः व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

इराने एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या नैराश्याचे कारण सांगितले. ती म्हणाली, ‘मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होते. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. अशा अनेक लहान लहान घटना घडत गेल्या, ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्र-मंडळींसोबत बाहेर जाणे टाळायचे. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून काढायचे. हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. अखेर मी नैराश्यामध्ये असल्याची जाणीव मला झाली.’ इराच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सोबतच मानसिक आरोग्याविषयी देखील या निमित्त भरभरून चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतेय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here