नवी दिल्लीः भारतीय रुपयांना मजबूत करायचे असेल तर नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावावा असा अजब सल्ला देणारे भाजपचे खासदार यांनी पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था घसरल्याने भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारला फटकारले आहे. सध्या जी अर्थव्यवस्था घसरत आहे. त्याला बुद्धी पाहिजे अशी व्यंगात्मक टीका करीत स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ट्विटर हँडलवरून व्यंगात्मक टीका करीत सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, सामान्यपणे रिसेशन म्हणजे मंदी. महागाईसोबत येत असते. मागणी कमी झाल्यानंतर वस्तूच्या किंमती वाढत नाहीत. परंतु, आता भारताच्या अर्थव्यवस्थेत हे सर्व पाहायला मिळत आहे. मी हे गंमतीशीर म्हणत असलो तरी हे सर्व करायला किंवा फेल होण्यासाठी सुद्धा डोके लागते, असे स्वामी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची जी घसरण सुरू आहे. ती रोखण्यासाठी तसेच भारतीय रुपयांना मजबूत करायचे असेल तर भारतीय नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावण्यात यावा, असे केल्यास भारतीय रुपया मजबूत होईल, असा अजब सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला होता.

मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते. इंडोनेशियात नोटांवर गणपती यांचा फोटो आहे, या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतात. गणपती नोटावर असल्याने अनेक संकट दूर करतात. त्यामुळे मला वाटते की, भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी यांचा फोटो असायला हवा. जर भारतीय नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावला तर भारतीय रुपया मजबूत होईल. यावर कोणाचीही वाकडी नजर पडणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here