म. टा. प्रतिनिधी, : दारू पिऊन घरी आल्यावर मुलाने वडिलांच्या डोक्यात पाण्याचा भरलेला हंडा घालून त्यांचा खून केला. ही घटना रविवारी (१ नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास वेताळनगर, चिंचवड येथे घडली.
तानाजी सदबा सोलंकर (वय ५५, रा. मोरया हाउसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर, संजय तानाजी सोलंकर (३०) असे मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय रविवारी सायंकाळी दारू पिऊन घरी आला. त्या वेळी वडील तानाजी आणि संजय यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून संजयने पाण्याने भरलेला हंडा वडील तानाजी यांच्या डोक्यात घातला. शेजाऱ्यांनी तानाजी यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times