नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांत भारतात करोना संक्रमणाच्या परिस्थितीत सुधारणा दिसून येतेय. नव्यानं संक्रमित आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्यानं तसंच करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यानं उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून येतेय. अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३० जुलैनंतर सर्वात कमी आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात करोना संक्रमितांची एकूण संख्या ८२ लाख ६७ हजार ६२३ वर पोहचलीय. तर देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या साडे पाच लाखांवर आहे. सध्या देशात ५ लाख ४१ हजार ४०५ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

गेल्या २४ तासांत (शनिवारी सकाळी ८.०० पासून रविवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) करोनाचे ३८ हजार ३१० नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ५८ हजार ३२३ रुग्णांनी करोनावर मात केल्याचंही दिसून येतंय.

वाचा : वाचा :

तर सोमवारी ४९० जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेत. आत्तापर्यंत देशात १ लाख २३ हजार ०९७ जणांना कोविड १९ मुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

देशाचा (बरे झालेले रुग्ण) ९१.९६ वर पोहचलाय. पॉझिटिव्हीटी रेट (चाचणीत एकूण नमुन्यांपैंकी संक्रमित आढळलेले रुग्ण) ३.६६ क्के तर डेथ रेट (मृत्यू दर) १.४८ टक्क्यांवर आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा दर ६.५४ टक्क्यांवर आहे.

२ नोव्हेंबर रोजी १० लाख ४६ हजार २४७ करोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत एकूण ११ कोटी १७ लाख ८९ हजार ३५० नमुन्यांची तपासणी पार पडल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आलीय.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here