चंद्रकांत पाटील यांच्या प्रथम वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन सोमवारी पुण्यात झाले. यावेळी बोलताना त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. ‘कोथरूडमधून निवडून आल्यामुळं ‘कोल्हापूरहून पळून आले’ अशी टीका माझ्यावर केली जाते. मी अशा टीकेला भीत नाही. आजही कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील आमदाराने राजीनामा द्यावा, पोटनिवडणूक लावावी. मी निवडणूक लढायला तयार आहे. तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन,’ असं पाटील म्हणाले होते.
वाचा:
मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलेलीच नाही,’ असं ते म्हणाले. ‘विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेलं आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळं चंद्रकांतदादांसाठी राजीनामा कोण देणार? कशासाठी? हे होणार नाही, हे दादांनाही माहीत आहे. त्यामुळंच ते हिमालयात जाण्याची भाषा करत आहेत,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘ज्या कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांतदादा निवडून आले आहेत, ती जागा सोडण्याची परवानगी भाजप कशी देईल? दोन्हीही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळं पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हाला तुमची इथेच गरज आहे,’ असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times