मुंबई: मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्याच्या निर्णयाला केंद्राने आक्षेप घेतल्यानंतर आता भाजपनं राज्य सरकारला घेरण्याची संधी साधली आहे. या निमित्तानं भाजपचे आमदार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. ‘मेट्रो प्रकल्पाला होत असलेल्या विलंबासाठी सर्वस्वी राज्य सरकार दोषी आहे,’ असा आरोप शेलार यांनी केला आहे. (BJP targets CM over Metro Car Shed Row)

गोरेगाव येथील आरे कॉलनीत कारशेड उभारण्यास विरोध झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं ही कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्राच्या उद्योग व व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) त्यास आक्षेप घेत कारशेडचं काम थांबवण्याच्या सूचना राज्याला केल्या आहेत. तसं पत्रच सरकारला पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं हा प्रकल्प आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्षानं याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

वाचा:

‘मुख्यमंत्र्यांनी ‘आरे’च्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच यात राज्य सरकारचा कुहेतू असल्याचं आम्ही म्हटलं होतं. अहंकारी राजा व विलासी राजपुत्रामुळं मुंबईकरांना त्रास होतोय, असं आम्ही म्हटलं होतं. कारशेडसाठी नवी जागा निश्चित करताना मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का? किंवा ती जागा नावावर करून घेतली होती का?,’ अशी विचारणा आम्ही केली होती. मात्र, ती खबरदारी राज्य सरकारनं घेतली नव्हती हे आज केंद्राच्या पत्रामुळं आता स्पष्ट झालं आहे. अहंकारी प्रवृत्तीनं घेतलेल्या या निर्णयाचे दुष्परिणाम आता मुंबईकरांना भोगावे लागणार आहेत. मेट्रोच्या बाबतीत तर महाविकास आघाडीच्या सरकारची कार्यपद्धती तिघाडी प्रकारची आहे,’ अशी टीका शेलार यांनी केली.

वाचा:

‘सुरुवातीला हा प्रकल्प लटकवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनतर आता अडकवला गेला. जागेत बदल करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज होती, ते केलं गेलं नाही. त्यातून हा प्रकल्प अडकवला गेला. शिवाय, चुकीच्या गोष्टींची माहिती देऊन जनतेला भटकवलं गेलं. त्यामुळं मेट्रो प्रकल्पात उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे प्रकारातला आहे. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई मुख्यमंत्र्यांनी थोपलीय. या संपूर्ण प्रकरणात पूर्णपणे राज्य सरकार दोषी आहे,’ असा आरोप शेलार यांनी केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here