सिंधुदुर्ग: महसूल राज्यमंत्री यांच्या कोकण दौऱ्यातील पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. भाजपचे आमदार यांनी देखील हा व्हिडिओ ट्वीट करून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. ( criticises over a viral video)

अब्दुल सत्तार हे अलीकडेच कोकणच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी विविध विषयांची माहिती देण्यासाठी त्यांची पत्रकार परिषदही झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी यावेळी मास्क घातले होते. मात्र, पत्रकार परिषद सुरू असतानाच विनायक राऊत यांना शिंक आली. हे लक्षात येताच त्यांनी तोंडावरचा मास्क काढला आणि हात तोंडापुढं नेऊन ते शिंकले. कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रसंग सध्या बराच व्हायरल होतो आहे.

वाचा:

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी याबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. हे मास्क अर्धवट घालू नये. नाकावर नीट घ्यायला हवं, अशी जनजागृती देखील विविध माध्यमांतून केली जात आहे. मात्र, शिंक आली असताना खासदार राऊत यांनी हे मास्क काढल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

वाचा:

नीतेश राणे यांनी ही संधी साधून विनायक राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. नीतेश यांनी त्या प्रसंगाचा व्हिडिओच ट्वीट केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘हे आहेत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार. त्यांनी मास्क का घातलाय असा प्रश्न त्यांना विचारण्याची गरज आहे. अशा मूर्खांपासून देवाने कोकणाला वाचवावे.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here