मुंबई: ‘शिवसेनेचे १४५ आमदार निवडून आलेले नाहीत. त्या बळावर मुख्यमंत्री झालेत. त्यामुळं ते बाहेर पडले तर तुमचे आमदार किती असा प्रश्न लोक त्यांना विचारतील म्हणून ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत,’ असा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. सिधुदुर्गांत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीविरुद्धात नारायण राणे यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. लवकरच कोकणातून शिवसेना हद्दपार केली जाईल, असा घणाघात राणे यांनी केला आहे.

‘कोकणात शिवसेनेच्या ११ आमदारांना पुढच्या निडणूकीत घरी बसवण्यात येतील. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्यात येईल. त्यामुळं आता ५६ आमदार सोबत घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईलं,’ असा दावा राणे यांनी केला आहे.

‘कोकणात सत्तेत आलेले ११ आमदार आहेत. त्यापैकी एकही आमदार सभागृहात कोकणच्या विकासाबाबत बोलत नाही. कोकणातील पाटबंधारे, रस्ते, शाळा, करोनाची परिस्थिती याबाबत या आमदारांना प्रश्न उठवताना पाहिलंय का?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here