वॉशिंग्टन: जगभराचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी पोस्टल मतदान सुरू केले होते. आज प्रत्यक्ष निवडणूक पार पडणार आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळ सकाळी सहा वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मतदान होत असल्यामुळे मतदान केंद्रावर योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. जाणून घेऊयात मतदानाचे लाइव्ह अपडेट्स:

लाइव्ह अपडेट्स:

>>आज अमेरिकेत प्रत्यक्ष मतदान होत असले तरी, अनेक प्रांतांतील पूर्वमतांची मोजणी आणखी काही दिवस चालणार आहे. त्यामुळेच ‘निकालात काही संशयास्पद आढळल्यास आमच्या वकिलांची फौज कायदेशीर लढाईसाठी तयार आहे,’ असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. यामुळेच यंदाच्या अध्यक्षपदाचा निर्णय जनतेच्या दरबारात ठरणार की, न्यायालयात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

>> ज्याच्याकडे बहुमत तोच उमेदवार विजयी असे म्हटले जात असले तरी अमेरिकेत याबाबत काहीसं वेगळं चित्र आहे. अमेरिकेत बहुसंख्य लोकांनी पारड्यात मतदान केले तरी तोच उमेदवार राष्ट्राध्यक्ष होईल असा काही नियम नाही. क्लिक करा आणि वाचा सविस्तर

>> करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा पोस्टल मतदानाकडे कल; प्रत्यक्ष मतदानापूर्वीच जवळपास १० कोटी मतदारांचे पोस्टल मतदान

>> न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि वर्जिनियामध्ये मतदानाला सुरुवात

>> अमेरिकेत मतदानाला सुरुवात; न्यू हॅम्पशायर येथे झाले पहिले मतदान; न्यू हॅम्पशायर येथील डिक्सविले नॉच आणि मिल्सफिल्डमध्ये प्रत्येकी एक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. डिक्सविले नॉचमध्ये फक्त पाचच मतदार आहेत. कॅनडाच्या सीमेवर असलेल्या या गावात मध्यरात्रीच मतदान केले जाते.

>> करोना संसर्गाच्या थैमानात जगातील जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत तीन नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असून डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचे आव्हान आहे. बायडन हे बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना उपराष्ट्रपती होते. निवडणूक प्रचारात करोनाचा संसर्ग, वर्णद्वेष, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आदी मुद्दे ठळकपणे समोर आले होते.

>> अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येते. अमेरिकेत स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदारांना या वेळे दरम्यान पोलिंग बूथवर जाऊन मतदान करता येणार आहे. रात्री नऊ नंतर मतदानाची प्रक्रिया थांबवण्यात येणार आहे.

>> यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाआधीच विक्रमी मतदान झाले आहे. Early Ballots Votesनुसार, पोस्टल, ई-मेलद्वारे आतापर्यंत जवळपास ९ कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मागील २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा ही संख्या जवळपास ६५ टक्के अधिक आहे. करोनाच्या संसर्गामुळे यंदा अनेकांनी Early Ballots Votesद्वारे मतदान केले असल्याचे म्हटले जात आहे.

>> यंदाची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडी आणि खर्चिक निवडणूक ठरणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी दुप्पट खर्च होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी
>> अमेरिकेत सध्या बायडन यांची ‘सातारा टाइप’ सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन फ्लोरिडा येथील सभेत भाषण करत असताना अचानक पाऊस आला. मात्र, बायडन यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. वर्षभरापूर्वा सातारा येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पावसात सभा घेतली होती. त्यांच्या या सभेनंतर राज्यातील निवडणूक प्रचारावर मोठा प्रभाव टाकला होता. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here