नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत करोना व्हायरसचा प्रादुर्भाव ( coronavirus delhi cases ) पुन्हा वेगाने होत आहे. नवीन रुग्णांमुळे मंगळवारी दिल्लीचे सर्व विक्रम मोडीत निघाले. गेल्या २४ तासांत करोना व्हायरस संसर्गाचे ६७२५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. हा आतापर्यंतची विक्रम आहे. दिल्लीत यापूर्वी संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या कधीच ६ हजारांवर गेली नव्हती. यापूर्वी 30 ऑक्टोबरला ५८९१ नवीन रुग्ण आढळले होते. राजधानीत संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या ४ लाखांच्या पलिकडे ४,०३,०९६ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत आणखी ४८ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढून तो ६६५२ पर्यंत गेला आहे. या कालावधीत ३६१० रुग्ण बरे झाले. यानुसार आतापर्यंत एकूण ३,६०,०६९ जण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत १३,५६० आरटी-पीसीआर चाचण्या आणि ४५,९८० अँटीजन चाचण्यांसह ५९,५४० चाचण्या घेण्यात आल्या. राजधानीत करोनातून बरे होण्याचे प्रमाण हे ८९.३२ टक्के आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ९.०२ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.६५ टक्के आहे. सध्या दिल्लीत अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या, ३६,३७५ इतकी आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

देशात ५,४१,४०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत करोनाचे ३८,३१० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून ८२,६७,६२३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ४९० रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात एकूण १,२३,०९७ जणांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here