या दोन दिवसांच्या दौऱ्यात गृहमंत्री पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून बंगालमध्ये पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी काही धोरणं आखणार असल्याचं सांगण्यात येतंय.
काही दिवसांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल सिन्हा यांना राष्ट्रीय सचिव पदावरून हटवण्यात आलं आणि तृणमूल काँग्रेसहून आलेल्या मुकूल रॉय तसंच अनुपम हाजरा यांसारख्या माजी नेत्यांना पद देण्यात आले, त्यानंतर पक्षात नाराजीचा सूर उमटू लागला. मुकूल रॉय सद्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात होते. आता मुकूल रॉय यांची भाजपनं पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमणूक केलीय.
याच पार्श्वभूमीवर पक्षातील नाराजी मिटवण्याचा आणि पक्षाला निवडणुकीच्या दृष्टीने मजबूत बनवण्यासाठी अमित शहा प्रयत्न करणार आहेत. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान अमित शहा बांकुरा आणि कोलकातामध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक करणार आहेत.
वाचा : वाचा :
अमित शहा यांच्यासोबत भाजप प्रमुख जे पी नड्डा हेदेखील पश्चिम बंगालच्या दौऱ्यात सहभागी होणार होते. परंतु, काही कारणास्तव त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय.
राज्यात आगामी वर्षात एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. ६५ वर्षीय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी भाजपकडून तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times