मुंबई: राज्यात आज १२० बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ४ हजार ९०९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ६ हजार ९७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील करोना रिकव्हरी रेट ९०.४६ टक्के झाला असून सध्या १ लाख १६ हजार ५४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ( Latest Updates )

वाचा:

राज्यात आज ६ हजार ९७३ रुग्णांनी करोनावर मात केली असून, आतापर्यंत एकूण १५ लाख ३१ हजार २७७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात दिवसभरात ४ हजार ९०९ रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ९२ हजार ६९३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२० रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील एकूण मृतांची संख्या ४४ हजार २४८ इतकी झाली आहे. महापालिकेच्या हद्दीत मंगळवारी ७४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या दोन लाख ५९ हजार ८५७ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाखांच्या जवळ पोहचली असून, आज ७०१ रुग्ण बरे झाले आहेत. तर नवीन ५१३ रुग्णांची भर पडल्यानंतर बाधितांची संख्या दोन लाख १३ हजार १५९ वर गेली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख ९९ हजार १६ इतकी झाली आहे. १६ रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा वाढत ८,७५६ वर पोहचला आहे.

वाचा:

मुंबई वेगाने सावरतेय

मुंबईतील करोना संसर्ग नियंत्रणात येत आहे. ४ ऑक्टोबरला मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ६४ दिवसांपर्यंत खाली आला होता. आता पालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नांतून हा कालावधी थेट १८२ दिवसांवर पोहचला आहे. करोनाने मुंबईत मार्चपासून ठाण मांडले असून, सुरुवातीच्या कालावधीत करोनासंसर्गाने मुंबईकरांची झोप उडवली होती. कालातंराने विविध उपाययोजनांनी परिस्थिती निवळत असल्याचे आढळून येत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी वाढत गेला होता. २६ ऑगस्टला रुग्णदुपटीचा कालावधी ९३ दिवसांचा होता. त्यानंतर रुग्णसंख्याही वाढत जाऊन दररोजची रुग्णसंख्या सुमारे अडीच हजारांवर गेली होती. १२ सप्टेंबरची आकडेवारी पाहिल्यास रुग्णदुपटीचा कालावधी ५८ दिवसांपर्यंत खाली आला आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. त्यातून पालिकेच्या हाती अचूक डेटा हाती येत गेला आणि संशयित रुग्णांचा शोध घेण्याचे प्रमाण अधिक वाढले. त्याप्रमाणे उपचारांचे प्रमाणही वाढून रुग्णसंख्या आटोक्यात येत चालली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here