शारजा: हैदराबादने मुंबईवर १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता प्ले-ऑफमध्ये हैदराबादचा सामना आरसीबीच्या संघाबरोबर होणार आहे. वॉर्नरने यावेळी ५८ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८५ धावांची तुफानी खेळी साकारली. साहाने यावेळी वॉर्नरला चांगली साथ देत ४५ चेंडूंत सात चौकार आण् एका षटकारासह नाबाद ५८ धावा फटकावल्या.

पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ( vs )एकही विकेट न गमावता हैदराबादचा मुंबईवर मोठा विजय
षटकारासह डेव्हिड वॉर्नरचे धडाकेबाज अर्धशतक
हैदराबादची धमाकेदार सुरुवात, ८ षटकांत बिन बाद ७१

मुंबईचे हैदराबादपुढे १५० धावांचे आव्हान
मुंबईने यावेळी हैदराबादच्या संघापुढे विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले. पोलार्डने यावेळी अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत २५ चेंडूंत ४१ धावा फटकावल्या. त्यामुळेच मुंबईला हैदराबादपुढे सन्मानजनक आव्हान ठेवता आले.

मुंबईला सातवा धक्का, ७ बाद ११६ अशी अवस्था

मुंबईला सहावा धक्का, इशान किशन आऊट

मुंबईचा अर्धा संघ गारद

एकाच षटकात मुंबईच्या संघाला दोन मोठे धक्के

मुंबईला दुसरा धक्का, क्विंटन डीकॉक आऊट

मुंबईला मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट

मुंबईच्या संघात नेमके कोणते बदल झाले, पाहा…

हैदराबादने नाणेफेक जिंकली, मुंबईची प्रथम फलंदाजी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here