सियाचीनमध्ये पश्चिम आघाडीवर आणि पूर्व लडाख सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांकरता अत्यंत थंड हवामानातील कपड्यांपैकी ६० हजारांचा साठा या जवानांसाठी कायम राखून ठेवण्यात येतो. एलएसीवरील चीनची आक्रमकता लक्षात घेता या भागात सुमारे ९० हजार जवान तैनात आहेत. यामुळे यंदा ३० हजार अतिरिक्त कपड्यांची आवश्यकता होती.
कडाक्याच्या थंडीतील कपड्यांच्या खरेदीमुळे हाडं गोठवणाऱ्या लडाख थंड हवामानात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना यामुळे मदत होईल.
एलएसीवर भारताने दोन अतिरिक्त डिव्हीजन तैनात केल्या आहेत. यासाठी मैदानी भाग आणि माउंटन डिव्हीजनच्या जवानांना एलएसीवर तैनात करण्यात आलं आहे. या जवानांना गेल्या अनेक वर्षांपासून उंच भागात मोहीमा करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे.
भारत अमेरिकेतून अनेक प्रकारची सैन्य उपकरणं घेत आहेत. यात लष्कराच्या जवानांसाठी सिग सॉर असॉल्ट रायफलचाही समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times