मुंबईः बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा ‘तान्हाजीः द अनसंय वॉरियर’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आला आहे, असे मत अभिनेता याने व्यक्त केले आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याने चित्रपटाबद्दलची आपली मते मांडली आहेत.

बॉलिवूडचा सिंघम , अभिनेत्री काजोल आणि सैफ अली खान अशी तगडी स्टार कास्ट असलेला तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आठवडाभरात सुमारे ११६ कोटींची कमाई केल्यानंतर सैफ अली खानने केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चित्रपटात सैफ अली खानने उदयभान राठोडची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटातील कथा राजकारणाच्या अनुषंगाने थोड्याफार प्रमाणात बदलण्यात आली आहे. ही बाब गंभीर तसेच चुकीची आहे. चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर या भूमिकेच्या मी प्रेमात होतो, त्यामुळे यावर ठोस मत मांडू शकलो नाही, असे सैफ म्हणाला. चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना काही गोष्टी खटकत होत्या. भूमिका सोडायची नव्हती. त्यामुळे काहीच बोलू शकलो नाही. मात्र, पुढील वेळी योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य भूमिका घेण्याचे धाडस मी करेन, असेही त्याने सांगितले.

ही संकल्पना ब्रिटिशांनी देशात रुजवली. त्याआधी ती नव्हती, असे माझे मत आहे. चित्रपटाच्या आधारे आपण कोणताही तर्क मांडू शकत नाही, असे सांगत अनेक कलाकार उदारमतवादाचा पुरस्कार करतात. मात्र, प्रसिद्धीच्या झोतात बाकी सर्व गोष्टी विसरतात, हे दुर्दैवी आहे, असा टोलाही त्याने लगावला. तान्हाजी चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवण्यात आला आहे. चित्रपटाला व्यावसायिक स्वरूप देण्याच्या नादात इतिहासाकडे कानाडोळा करण्यात आला आहे. या चित्रपटात कोणतेही ऐतिहासिक तथ्य नाही, असा दावा त्याने यावेळी केला.

या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या राजकारणाचा आणि ऐतिहासिक तथ्यांचा आपापसात मेळ नाही. एक अभिनेता नाही, तर एक भारतीय म्हणूनही माझे हेच मत आहे. पुढीलवेळी चित्रपट स्वीकारताना या गोष्टींची काळजी घेईन, असेही त्याने स्पष्ट केले. चित्रपटात कोणताही इतिहास दाखवला नसताना मी ही भूमिका का केली, असा प्रश्न मला पडला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली. चित्रपट हिट झाला, तरी ही बाब गंभीर आहे, असेही त्याने सांगितले.

देश सेक्युलर राहणार नाही

देशाची फाळणी झाली, तेव्हा आमच्या कुटुंबातील काही जण देश सोडून गेले. आमचा परिवार इथेच राहिला. कारण, आपण देशात आहोत, याची जाणीव त्यांना होती. मात्र, आजच्याघडीला ज्या पद्धतीने देशात घडामोडी सुरू आहेत, त्या पाहता आगामी काळात देश धर्मनिरपेक्ष राहणार नाही, अशी भीती सैफने व्यक्त केली. देशातील घडामोडींवर आम्ही मते व्यक्त केली की, चित्रपटांवर बंदी घातली जाते, बहिष्कार घालण्याचा आवाहन केले जाते. लोकांचे नुकसान केले जाते. म्हणूनच कोणी यावर बोलत नाही, असेही तो म्हणाला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here