अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे समोर आले आहे. जाणून घेऊयात अमेरिकेच्या निवडणूक निकालाचे लाइव्ह अपडेट्स:

>>> लाइव्ह अपडेट्स:
>> आतापर्यंत ट्रम्प यांच्याकडे एकूण ९२ इलेक्टोरल कॉलेज मतदान, बायडन यांच्याकडे ११९ इलेक्टोरल कॉलेज मतदान

> सर्वेक्षणांनुसार काही राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांचा विजय निश्चित आहे. तर काही राज्ये नवा राष्ट्राध्यक्ष ठरवण्यात मोठी भूमिका बजावणार आहेत…
वाचा सविस्तर:

> वाचा:

> टेक्सासमध्ये अटीतटीचा सामना; बायडन यांना ४९.९९ मते, ट्रम्प यांना ४८.७० टक्के मतदान

> ओहियो, नॉर्थ कॅरिलोना आणि पेन्सिलवेनियामध्ये जो बायडन यांच्याकडे निर्णायक आघाडी

> फ्लोरिडा आणि मिशिगन या राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर

> बायडन यांच्यासाठी जॉर्जिया, फ्लोरिडा आणि उत्तर कॅरिलोना या राज्यामधील कौल महत्त्वाचा; या राज्यात विजय मिळवल्यास ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

> मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त

> इंडियानामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची बायडन यांच्यावर आघाडी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here