नवी दिल्ली: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या अटकेवरून आता महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्री यांनी देखील अटकेवर भाष्य करत या अटकेचा निषेध केला आहे. महाराष्ट्र सरकारची ही कारवाई आणीबाणीसारखीच असल्याचे टीकास्त्र जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर सोडले आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत हा निषेध नोंदवला आहे. जावडेकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुंबईत प्रेस-पत्रकारितेवर झालेला हल्ला निंदनीय आहे. ही आणीबाणीसारखीच महाराष्ट्र सरकारची कारवाई आहे. आम्ही या कारवाईचा निषेध करतो.’
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times